Loudspeaker Use in Pune: आता पुण्यात 15 दिवसांसाठी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी; आदेश जारी, जाणून घ्या तारखा

महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार 2 दिवसांसाठी परवानगी दिली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. वरील सणांच्या दिवशी, सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, ध्वनी मर्यादा कायम ठेवून लाऊडस्पीकर आणि ध्वनी प्रवर्धन प्रणालींचा वापर करण्यास परवानगी असेल.

Loudspeaker | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केंद्र सरकारच्या ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) सुधारणा नियम 2017 अंतर्गत एक आदेश जारी केला आहे, ज्याद्वारे केवळ 15 दिवसांसाठीच सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंतच लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये शिवजयंती, बुधवार 19 फेब्रुवारी 2025, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, सोमवार 14 एप्रिल, महाराष्ट्र दिन, गुरुवार 1 मे, गणपती उत्सव, ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी, सोमवार 1 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 असे 6 दिवस, 1 आणि 2 ऑक्टोबर अशा 2  दिवसांसाठी नवरात्र उत्सव, नाताळ, गुरुवार 25 डिसेंबर आणि वर्षअखेर, बुधवार 31 डिसेंबर 2025, या दिवसांचा समावेश आहे.

इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार 2 दिवसांसाठी परवानगी दिली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. वरील सणांच्या दिवशी, सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, ध्वनी मर्यादा कायम ठेवून लाऊडस्पीकर आणि ध्वनी प्रवर्धन प्रणालींचा वापर करण्यास परवानगी असेल. आदेशात असेही म्हटले आहे की ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसल्याने, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व संबंधित एजन्सींवर राहील. (हेही वाचा: Yerawada-Katraj Twin Tunnel: पुणेकरांसाठी आनंदाची बाब! येरवडा-कात्रज ट्विन टनेल अंडरपासला CM Devendra Fadnavis यांची मंजुरी)

Loudspeaker Use in Pune:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now