Lok Sabha Elections Exit Poll 2024 Live Streaming On News18 Lokmat: लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर; न्यूझ 18 लोकमतवर पाहू शकाल लाइव्ह
एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले, असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जातो. या आधारे एक्झिट पोल तयार केला जातो. एक्झिट पोलवरून निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावला जातो.
Lok Sabha Elections Exit Poll 2024: लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यातील मतदान आज, शनिवारी (1 जून 2024) संध्याकाळी पूर्ण होईल. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होतील. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, तर 'इंडिया' आघाडीने भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता मतदानानंतर आणि निवडणूक निकालापूर्वी एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत. आज संध्याकाळी तुम्ही न्यूझ 18 लोकमत (News18 Lokmat) वर लाइव्ह एक्झिट पोल पाहू शकाल.
एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले, असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जातो. या आधारे एक्झिट पोल तयार केला जातो. एक्झिट पोलवरून निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावला जातो. भारतात कोणतीही सरकारी एजन्सी एक्झिट पोल आयोजित करत नाही, परंतु अनेक खाजगी एजन्सी आहेत ज्या एक्झिट पोल आयोजित करतात.
या ठिकाणी पाहू शकाल न्यूझ 18 लोकमतवरील एक्झिट पोल-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)