Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून Ravindra Waikar यांना उमेदवारी
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात यंदा मे महिन्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 20 मे (टप्पा 5) आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात यंदा मे महिन्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 20 मे (टप्पा 5) आहे. या ठिकाणी शिवसेना (UBT) कडून अमोल कीर्तिकर यांना तिकीट देण्यात आले आहे. या जागेवर 2019 च्या निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या संजय निरुपमांचा पराभव केला होता. मात्र पुढे शिवसेनेतल्या फुटीनंतर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर शिवसेना शिंदे गटात गेले. तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर ठाकरे गटातच राहिले. आता ठाकरे गटाने लोकसभेसाठी या जागेवर अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. (हेही वाचा: Amit Shah Deepfake Video Case: महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल; अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ केला होता शेअर)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)