Lok Sabha Election 2024: बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या पाठिंब्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मानले आभार !

वंचितने बारामती मधून सुप्रिया सुळेंविरूद्ध उमेदवार जाहीर केला नाही. तसेच आपला जाहीर पाठिंबा असल्याचेही म्हटलं आहे.

Supriya Sule | Twitter

वंचित बहुजन आघाडी,  महाविकास आघाडीत सहभागी होण्याची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये फिस्कटली आणि त्यांनी एकला चलो चा नारा दिला. पण काल वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारी यादी सोबत बारामती मध्ये वंचित सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केले आहे. वंचितच्या या जाहीर पाठिंब्याची सुप्रिया सुळेंनी दखल घेत X  वर पोस्ट करत 'प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद.' असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement