Lok Sabha Election 2024 Result: पीएम मोदींच्या विजयापूर्वीच मुंबईमध्ये बनवले जात आहेत 10 हजार लाडू; 'लोकांना वाटून आनंद साजरा करणार'- BJP Leader Atul Shah
जय-पराजयाचा निर्णय येण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. 4 जूनचा निकाल आपल्याच बाजूने लागण्याची खात्री बाळगत पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहेत.
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. देशात कोण नवीन सरकार स्थापन करणार हे जवळजवळ उद्या निश्चित होणार आहे. आता जय-पराजयाचा निर्णय येण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. 4 जूनचा निकाल आपल्याच बाजूने लागण्याची खात्री बाळगत पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहेत. उद्याचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईमध्ये भाजपकडून 10 हजार लाडू तयार केले जात आहेत. याबाबत भाजपचे माजी आमदार अतुल शहा म्हणतात. ‘प्रत्येक विजय आणि आनंद मिठाईने साजरा करणे ही आपली संस्कृती आहे. पंतप्रधान मोदी मोठ्या बहुमताने विजयी होतील. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये लाडू वाटून हा विजय साजरा करू. यावेळी आम्ही, 'फिर एक बार मोदी सरकार, तीसरी बार मोदी सरकार' असे लिहिलेल्या बॉक्समधून लाडू वाटणार आहोत. यासाठी आम्ही 10,000 लाडू तयार करत आहोत.’ (हेही वाचा: Lok Sabha Election Results 2024: पटना मध्ये लोकसभा निवडणूक निकाल पूर्वी कार्यकर्त्यांनी सुरू केली 400 किलो लाडू बनवण्याची तयारी)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)