लोकसभा निवडणूक अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली असताना आज शिवसेना पक्षाकडून ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज त्यांनी उमेदवारी जाहीर होताच भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षातील अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
राज ठाकरेंच्या भेटीला श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के
कल्याण-डोंबिवली मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्री. श्रीकांत शिंदे यांनी मा. राजसाहेब ठाकरे यांची आज शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तसेच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते.#MNSAdhikrut pic.twitter.com/y0eP4NNyTO
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)