Pune Riverfront Development प्रकल्पाविरोधात नागरिकांचं पुण्यात 'चिपको आंदोलन'

पुण्यामध्ये मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्याच्या विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरल्याचं पाहण्यात आलं आहे.

Pune | Twitter

पुण्यामध्ये मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्याच्या विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरल्याचं पाहण्यात आलं आहे. यासाठी जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. आबालवृद्धांनी यामध्ये 'चिपको आंदोलन' केलं. अनेकांनी झाडांना मिठी मारत वृक्षतोडीला प्रखर विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पासाठी झाडं तोडून ती  पुन्हा लावली जातील पण ती टिकण्याची शक्यता कमी आहे. तसेच प्रकल्पामुळे अन्य समस्या निर्माण होणार आहेत त्याकडेही लोकांनी लक्ष वेधलं आहे.