Mumbai Local Derails Video: मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरले, पश्चिम रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबई लोकल ट्रेनचे चाक रुळावरुन घसरल्याने त्याचा पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे वृत्त आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरल्याचे समजते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनेची नोंद घेतली असून, देखभाल, दुरुस्थीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. पुढच्या काहीच वेळात वाहतुक पूर्ववत होईल, असे सांगितले जात आहे.

मुंबई लोकल ट्रेनचे चाक रुळावरुन घसरल्याने त्याचा पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे वृत्त आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरल्याचे समजते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनेची नोंद घेतली असून, देखभाल, दुरुस्थीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. पुढच्या काहीच वेळात वाहतुक पूर्ववत होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे. तसेही, मुंबई लोकल वाहतूक संथ होण्यास विशेष कारण लागत नाही, कधी पाऊस पडल्याने, कधी पेंटाग्राफवर कावळा अडकल्याने तर कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेकदा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement