Local Body Elections: 18 जानेवारीला राज्यात 95 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका; मतदानासाठी सावर्जनिक सुट्टी जाहीर
महाराष्ट्र सरकार कडून 18 जानेवारीला महाराष्ट्रात मतदान असलेल्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
18 जानेवारीला राज्यात 95 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता निवडणुका होत आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुका होणार आहेत. या मतदानासाठी सावर्जनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
MAHARASHTRA DGIPR ट्वीट
राज्यातील ९५ नगरपंचायती, २ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेची पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी १८ जानेवारीला सावर्जनिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले.#Election pic.twitter.com/Yohw5Ph5iA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

