Sachin Waze यांनी लिहिले ED ला पत्र; Anil Deshmukh प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी
अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे
निलंबित महाराष्ट्र पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) पत्र लिहून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनी आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले असून त्यात त्यांनी अनिल देशमुख यांनी आपल्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर अनिल देशमुखच्या सांगण्यावरून बारमधून वसुलीही केल्याचे वाझे यांनी शपथपत्रात कबूल केले. देशमुख यांनी आपणावर आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाझे यांनी केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)