Labour Ministry Employee Data: एप्रिलमध्ये ESIC मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढली; 17.88 लाख नवीन सदस्य जोडले गेले

नवीन नोंदणींमध्ये एप्रिलमध्ये जोडल्या गेलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षे वयापर्यंतचे 8.37 लाख कर्मचारी आहेत.

ESIC

कामगार मंत्रालयाने सांगितले की, या वर्षी एप्रिलमध्ये कर्मचारी राज्य विमा योजनेत (Employees State Insurance Scheme) 17.88 लाख नवीन कर्मचारी जोडले गेले आहेत. ESIC द्वारे जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 मध्ये सुमारे 30,249 नवीन संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे आणि त्यांना ESIC अंतर्गत आणले गेले आहे. आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, देशातील तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. नवीन नोंदणींमध्ये एप्रिलमध्ये जोडल्या गेलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षे वयापर्यंतचे 8.37 लाख कर्मचारी आहेत. एप्रिल 2023 च्या पगार डेटाच्या लिंगनिहाय विश्लेषणानुसार, 3.53 लाख महिला सदस्यही त्यात सामील झाले आहेत. शिवाय, एप्रिल 2023 मध्ये, एकूण 63 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांची ईएसआय योजनेंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. (हेही वाचा: Job Opportunities in Konkan: कोकणात वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; 448 पदांची होणार भरती, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)