Kurla Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा पोहोचला 14 वर
आमदार संजय पोतनीस यांनी 2016 मध्ये ही इमारत C1 वर्गवारीत नोंदवण्यात आल्याचे सांगितले. ऑडिटनंतर, त्याचे C2 अंतर्गत पुनर्वर्गीकरण करण्यात आले.
मुंबईतील कुर्ला परिसरात 4 मजली इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी 2016 मध्ये ही इमारत C1 वर्गवारीत नोंदवण्यात आल्याचे सांगितले. ऑडिटनंतर, त्याचे C2 अंतर्गत पुनर्वर्गीकरण करण्यात आले. C2 पुनर्वर्गीकरणानंतर, त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते, परंतु तसे केले गेले नाही. बीएमसीच्या वतीने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, 9 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)