Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 वर; सायन रुग्णालयात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू

या प्रकरणातील आरोपीची बेस्ट आणि आरटीओची टीम लवकरच चौकशी करणार असल्याचा दावाही मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Kurla BEST Bus Accident: मुंबईमधील कुर्ला बेस्ट बस अपघातात जखमी झालेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठ झाली आहे. 9 डिसेंबर रोजी कुर्ला परिसरातील गजबजलेल्या रस्त्यावर महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या इलेक्ट्रिक बसने सात जणांना चिरडले होते. या अपघातात 42 जण जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचेही नुकसान झाले. जखमींपैकी एकाचे नाव फजलू रहमान असे असून त्याचा सोमवारी मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेस्टने पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. बसचालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात आहे. मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याची परवानगी देण्यापूर्वी त्याला तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.

दुसरीकडे, आरटीओच्या तपासणीत बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसून बसची स्थितीही ठीक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीची बेस्ट आणि आरटीओची टीम लवकरच चौकशी करणार असल्याचा दावाही मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. अहवालानुसार, मोरेच्या रक्ताचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. म्हणजे घटनेच्या वेळी संजय मोरे मद्यधुंद अवस्थेत नव्हता याची पुष्टी झाली आहे. (हेही वाचा: Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना)

Kurla BEST Bus Accident:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)