क्रांती रेडकर यांच्याकडून नामोल्लेख टाळत ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांच्यावर टीका
क्रांती रेडकर यांच्याकडून नामोल्लेख टाळत ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांच्यावर टीका
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी ट्विट करुन नामोल्लेख टाळत नवाब मलिक यांना टोला लगावला आहे. खोचक ट्विट करत क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी डाळ मखनी आणि जिरा तांदूळ होता, जीरा भात घरी बनवला होता. डाळ मखनी बाहेरून मागवली होती. त्याची किंमत 190 रुपये होती. पुराव्यांसह मीडियाला माहिती देते. नाहीतर उद्या सकाळी कोणी आरोप करेन की आम्ही सरकारी अधिकार्याचे जेवण खाल्ले. त्यात कुटुंबाला आणू नये, असे म्हणत काहीसे तीरकस ट्विट क्रांती रेडकर यांनी केले आहे.
क्रांती रेडकर ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)