Pune Koyta Gang: कोयत्या गँगचा धुमाकुळ सुरुच, स्कुल व्हॅनवरच्या हल्ल्यात चालक जखमी,अल्पवयीन आरोपींना अटक
पुण्यातील वाघोली येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि चालकाला कोयत्याने मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे
Pune Koyta Gang: पुण्यातील वाघोली येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि चालकाला कोयत्याने मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १७ वर्षाच्या दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेक कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅनमध्ये सहा ते दहा वयोगटातील किमान आठ विद्यार्थी बसले होते. त्यांच्या शाळेत जात असताना ही घटना घडली. घटनेनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोयत्याने व्हॅनच्या काचा फोटल्याने चालकाला दुखापत झाली आहे. सचिन इंगवले असं चालकाचे नाव आहे. त्यांच्यावर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- भर दिवसा तरुणावर कोयत्याने वार, पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुध्दात गुन्हा दाखल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)