Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल; विरोधी पक्ष नेत्यांची चौकशीची मागणी

लेटेस्टी मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र सोशल मिडियावर याबाबत अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Kirit Somaiya (Pic Credit - ANI)

राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ लीक झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी झी 24 तासला सांगितले. लेटेस्टी मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र सोशल मिडियावर याबाबत अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

याबाबत यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘‘किळस’ वाण्या सोमय्यांची चौकशी झालीच पाहिजे. अनेक नेत्यांवर तथ्यहीन आरोप करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्यांचा खरा चेहरा यानिमित्तानं सर्वांसमोर आलाय. कोंबडं झाकून ठेवलं तरी आरवायचं राहत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला गेला तरी भाजपमधले ‘किळस’ वाणे सोमय्या बाहेर येतच राहणार. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजप च्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)