Kirit Somaiya Discharged: किरीट सोमय्या यांना पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सोमय्या यांनी पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली होती.

Kirit Somaiya Discharged (PC - Twitter)

Kirit Somaiya Discharged: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. आज त्यांना संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमय्या यांनी पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली होती. ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणे माफिया सेना मला थांबवू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement