Khalapur Rains: आपटा गावालगत पातळगंगा नदीला पूर; गावकर्यांची छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती (Watch Video)
आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे देखील एक पथक तैनात करण्यात आले आहे.
सध्या पाऊस कोकण किनारपट्टीवर तुफान बॅटिंग करत आहे. अशामध्ये खालापूर, पेण पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावातील पातळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. या गावामध्ये सर्वत्र पुराचे पाणी भरले आहे. पण अशा स्थितीतही मंदिरात अर्धवट बुडालेल्या गणपतीची आरती करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र जमले. त्यांनी छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती केली आहे. आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे देखील एक पथक तैनात करण्यात आले आहे. Heavy Rains in Mumbai: मुंबईत मुसळधार पावसात बाळ पाण्यासोबत वाहून गेले, मातेचा हंबडा पाहून चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका; Video Viral .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)