Khalapur Rains: आपटा गावालगत पातळगंगा नदीला पूर; गावकर्यांची छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती (Watch Video)
आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे देखील एक पथक तैनात करण्यात आले आहे.
सध्या पाऊस कोकण किनारपट्टीवर तुफान बॅटिंग करत आहे. अशामध्ये खालापूर, पेण पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावातील पातळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. या गावामध्ये सर्वत्र पुराचे पाणी भरले आहे. पण अशा स्थितीतही मंदिरात अर्धवट बुडालेल्या गणपतीची आरती करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र जमले. त्यांनी छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती केली आहे. आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे देखील एक पथक तैनात करण्यात आले आहे. Heavy Rains in Mumbai: मुंबईत मुसळधार पावसात बाळ पाण्यासोबत वाहून गेले, मातेचा हंबडा पाहून चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका; Video Viral .
पहा ट्वीट
खालापूर, पेण पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावालगत जाणाऱ्या पातळगंगा नदीला पूर आल्याने संपूर्ण गाव पाण्यामध्ये. पाण्यात अर्धवट बुडालेला गणपती मंदिरात ग्रामस्थांनी छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती केली.#rain #MaharashtraRain #News18Lokmat pic.twitter.com/sqIs20pA4a
— News18Lokmat (@News18lokmat) July 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

