Jitendra Awhad Resigns: जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा  दिला आहे. आव्हाडांसोबत ठाण्यातील पदाधिकार्‍यांनीही राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्यामागे शरद पवार यांच्या एनसीपी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय असल्याचं कारण सांगितलं जात आहे. दरम्यान पवारांनी कार्यकर्त्यांना, नेत्यांना विश्वासात न घेतल्याने हा राजीनामा जितेंद्र आव्हाडांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. काल अजित पवारांनी मात्र याबाबत कार्यकर्त्यांची समजूत काढताना कोणीही राजीनामे देऊ नयेत ते स्वीकारले जाणार नसल्याचं सांगितलं आहे. Sharad Pawar एनसीपी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करण्यास 'सशर्त' तयार; कार्यकर्त्यांकडे मागितला 2-3 दिवसांचा वेळ - अजित पवार यांची घोषणा.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या