Jitendra Awhad Attacked: राष्ट्रवादी- SP नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; संभाजी राजेंवर केली होती टीका, तपास सुरु
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तीन तरुण काठ्यांनी हल्ला करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Jitendra Awhad Attacked: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना, कोल्हापूरचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज तीन कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही लोकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. संभाजीरांजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का? हे तपासावे लागेल, असे विधान आव्हाड यांनी केले होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तीन तरुण काठ्यांनी हल्ला करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांच्या कारवाईला न जुमानता हे तिघेही लाठ्याने गाडीच्या काचा फोडत आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) चार कार्यकर्त्यांना गुरुवारी ताब्यात घेतले होते. (हेही वाचा: Matrimonial Fraud Case in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये 40 मुलींची फसवणूक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात; मेट्रोमॅनी साईट वर फसवणूक)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)