जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश
समर्थ रामदास स्वामी यांनी जांबसमर्थ मध्ये 1535 मध्ये या मूर्तींची स्थापना केली होती.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी 1535 मध्ये या मूर्तींची स्थापना केली होती. आज सकाळी स्थानिकांना मूर्त्या न दिसल्याने त्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)