Jalgaon Bus Fire: रावेरजवळ भरधाव खासगी बसला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, प्रवाशांचा सामान खाक

पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Jalgaon Bus Fire: पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. प्रवाशांनी कशाबसा जीव वाचवल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत 20 प्रवाशांचे प्राणा वाचले असून सर्वजण सुखरुप आहे. मात्र, त्यांच्या सामानाचा कोळसा झाला आहे. ही घटना रावेर- सावदा रस्त्यावरील वडगावजवळील सुकी नदीच्या पुलाजवळ घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी रावेरकडून पुण्याकडे निघालेली साई सिध्दी ट्रॅव्हल्सची रावेर- पुणे बस प्रवाशांना घेऊन जात होती. रावेर- सावदा रस्त्यावरील वडगावाजवळील सुकी नदीच्या पुलापुढील वळणावर बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांनी आगीतून वाचण्यासाठी गाडीतून उतरण्यास सुरुवात केली. प्रवाशांची काही वेळांसाठी तारांबळ उडाली. बसमधून प्रवाशी उतरले मात्र प्रवाशांचे सामान बसमध्येच राहिले.

बसमध्ये लागलेल्या आगीत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. बसमध्ये २० प्रवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आग कशाने लागली याचा शोध पोलिस घेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now