Amravati Violence: अमरावतीत तीन दिवस इंटरनेट सेवा बंद, अफवा रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय
तसेच या काळात शहरातील ३ दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.
त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचारामुळे आज अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. या जमावाला मागे हटवण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला, त्यामुळे हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील ३ दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)