मोदी सरकारविरोधात 13 जूनला काॅंग्रेस नागपुर आणि मुंबई ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पटोले म्हणाले की, मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांना आपल्या बाहुल्या बनवल्या आहेत, आणि त्याचा वापर करुन विरोधकांनवर गैर वापर केला जात आहे. याचा विरोध करण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
Tweet
ज्या गांधी परिवाराने देशासाठी सदैव आपलं सर्वस्व अर्पण केलं, तो गांधी परिवार असेपर्यंत आपण हा देश तोडू शकत नाही हे मोदी सरकारने पुरतं ओळखलं आहे.
मोदी सरकारच्या या देश तोडोविरोधात १३ जून रोजी मुंबई आणि नागपूर ईडी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहूया !#Congress pic.twitter.com/DcG4pL5W90
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)