Indian General Election Results 2024: बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती असल्याचे सांगत शरद पवारांनी केली 'ही' मागणी
बीड लोकसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला तर विधानसभानिहाय मतमोजणीला साडेआठ वाजता गोपनीयतेच्या शपथेसह सुरुवात झाली. ही लढत एवढी अटीतटीची झाली
बीड लोकसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला तर विधानसभानिहाय मतमोजणीला साडेआठ वाजता गोपनीयतेच्या शपथेसह सुरुवात झाली. ही लढत एवढी अटीतटीची झाली की पंकजा मुंडे येणार की बजरंग सोनवणे याची धाकधूक अखेरच्या फेरीपर्यंत कायम होती. पंकजा मुंडे मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहेत. दोन्ही गटाकडून आपल्या विजयाचा विश्वास केल्यानंतर या ठिकाणी प्रचंड गोंधळ पहायला मिळाला यानंतर शरद पवार यांनी ट्विटकरून नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले की "बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे"
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)