Independent MP Vishal Patil Supports Congress: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा; Mallikarjun Kharge यांनी केले स्वागत
खासदार विशाल पाटील यांच्या पाठिंब्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वागत केले.
Independent MP Vishal Patil Supports Congress: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाच महिने आधी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राज्यातील राजकारणाचा चेहरामोहरा बदलला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 17 जागा लढवून 13 जागा जिंकणारा काँग्रेस हा एक मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. आता महाराष्ट्रात सांगलीमधून स्वतंत्र निवडणूक जिंकल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. खासदार विशाल पाटील यांच्या पाठिंब्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने अहंकारी आणि फुटीरतावादी राजकारणाला धडा शिकवला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘महाराष्ट्रातील जनतेने विश्वासघात, अहंकार आणि विभाजनाच्या राजकारणाचा पराभव केला. सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही खरी श्रद्धांजली आहे. आम्ही सांगलीतून निवडून आलेले खासदार श्री विशाल पाटील यांच्या पाठिंब्याचे स्वागत करतो. संविधान चिरंजीव हो!’ (हेही वाचा: Maharashtra Politics: उद्धव ठाकरे करणार भाजपशी हातमिळवणी? Priyanka Chaturvedi यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या- 'अजून वेळ आहे, थोडे सुधारा')
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)