अपक्ष आमदार Devendra Mahadevrao Bhuyar यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; शरद पवार यांच्या आजच्या बैठकीला होते उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर दोन्ही गटांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अध्यक्ष शरद पवार यांनी आपापल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदारांना व्हीप जारी केला होता.

अपक्ष आमदार Devendra Mahadevrao Bhuyar यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; शरद पवार यांच्या आजच्या बैठकीला होते उपस्थित
MLA Devendra Mahadevrao Bhuyar

अपक्ष आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वायसी चव्हाण केंद्रात आज झालेल्या बैठकीला भुयार उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर दोन्ही गटांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अध्यक्ष शरद पवार यांनी आपापल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदारांना व्हीप जारी केला होता. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीची संख्यात्मक ताकद दिसून आली. अहवालानुसार त्यांच्यासोबत बैठकीसाठी पक्षाचे 53 पैकी 35 आमदार पोहोचले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2023 10:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).