Independence Day 2024: यंदाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील Bandra-Worli Sea Link आणि Chhatrapati Shivaji Maharaj International Airport उजळले तिरंगी रंगात; पहा नयनरम्य रोषणाई (Watch video)
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे-वरळी सी लिंक तिरंग्यात उजळला. याचा एक नयनरम्य व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई दिसत आहे.
Independence Day 2024: देशभरात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. या दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक तिरंगी रंगात शहरे सजली आहेत. सर्वसामान्यांनीही घरोघरी तिरंगा लावला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे-वरळी सी लिंक तिरंग्यात उजळला. याचा एक नयनरम्य व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई दिसत आहे. यासह मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील तिरंगी रंगाची रोषणाई केली गेली अआहे. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया साइट X वर शेअर केला आहे. (हेही वाचा: 78th Independence Day Celebration: यंदा ‘Viksit Bharat @ 2047’ थीमवर साजरा होणार 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा; जाणून घ्या दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)