Income Tax Action in Jalna: जालना येथे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता, 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने; आयकर विभागाच्या कारवाईत सापडले मोठे घबाड
आयकर विभागाने (Income Tax Department,) जालना (Jalna) येथील एका स्टील कारखानदाराचे कारखाने आणि इतर मालमत्तांवर छापेमारी केली. या वेळी केलेल्या कारवाईत बेहिशोबी मालमत्तांचे धक्कादायक आकडे पुढे आले आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचे डोळे विस्फारतील अशी बातमी आहे. आयकर विभागाने (Income Tax Department,) जालना (Jalna) येथील एका स्टील कारखानदाराचे कारखाने आणि इतर मालमत्तांवर छापेमारी केली. या वेळी केलेल्या कारवाईत बेहिशोबी मालमत्तांचे धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. आतापर्यंत हातील आलेल्या माहितीनुसार संबंधित कारखानदाराकडून तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती आणि जवळपास 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्ता समोर आल्या आहेत. आयकर विभाग कागदपत्रे आणि इतर बाबींची अद्यापही पडताळणी करत आहेत. दरम्यान, कारवाई केलेल्या कारखानदाराचे नाव आयकर विभागाने अद्याप जाहीर केले नाही. ही कारवाई अद्यापही सुरु आहे. आयकर विभागाला संशय आहे की, या कारखानदाराचा काळा पैसा औरंगबाद येथली एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापारी गुंतवणूक करुन पांढरा करत आहे. याबाबतही शोधमोहिम सुरु आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने मोठी योजना आखून ही कारवाई केली. आयकर विभागाचे नाशिक विभागातील काही वरीष्ठ आणि राज्यभरातील 260 अधिकारी आणि कर्मचारी जवळपास 120 पेक्षाही अधिक वाहनांनी जालना शहरात पोहोचले. आयकर विभागाने कोणालाही शंका येऊ नये यासाठी वाहनांवर 'दुल्हन हम ले जायेंगे' असे स्टीकर लावले होते. जेणेकरुन लोकांना वाटावे हे लग्नाचेच वऱ्हाड आहे. दरम्यान, हे वऱ्हाड इच्छित स्थळी पोहोचल्यावर आयकर विभागाने कारवाईसुरु केली. कारवाईत सापडलेली सर्व रक्कम स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेत नेऊन मोजण्यात आली. ही रक्कम मोजण्यास सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती. रक्कम मोजून पूर्ण व्हायला रात्रीचे 1 वाजले.
व्हिडिओ
औरंगाबाद विभागाच्या आयकर कार्यालयाला माहिती मिळाली होती की, जालना येथील काही कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता कमावली आहे. ही मालमत्ता कोणत्याही स्वरुपात कायदेशीर नाही. त्यांच्याकडे या मालमत्तांचे पुरेसे तपशीलही नाहीत. अशा वेळी आयकर नाशिककच्या पथकाने काही वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक कर्मचारी यांच्या मदतीने जालना येथे 1 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कारवाई केली. वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन कारखानदार आणि व्यावसायिक यांच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाडच हाती लागले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)