ठरलं तर मग! राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक होणार, प्राधिकरण आयुक्तांची घोषणा

जगदीश पाटील यांनी केली आहे.

Election 2021 in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात 27 हजार 138 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची घोषणा प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानपरिषदेच्या निवडणूका घेण्यात येत आहे. यामध्ये आता सहकारी संस्थांच्या निवडणुकाही घोषित करण्यात आल्या आहेत.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)