IAF Air Show 2024: मुंबई विमानतळ 12 ते 14 जानेवारी दरम्यान 1 तासासाठी बंद; होत आहेत भारतीय हवाई दलाचे हवाई प्रात्यक्षिक

हवाई दलाच्या एअर शोमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि जुहू विमानतळ तीन दिवस दुपारी 12 ते 1 दरम्यान बंद राहणार आहे.

Mumbai Airport (PC - Wikimedia commons)

Mumbai Airport To Remain Shut: मुंबईमध्ये 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या दरम्यान हवाई कसरतींचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय हवाई दल (Indian Air Force), महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने, भारतीय हवाई दलाच्या जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत मुंबईत मरीन ड्राइव्हवर, तीन दिवस दुपारी 12 ते 1 या वेळेत हवाई कसरती करणार आहे. हवाई दलाच्या एअर शोमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि जुहू विमानतळ तीन दिवस दुपारी 12 ते 1 दरम्यान बंद राहणार आहे. मात्र त्याचा व्यावसायिक उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. तीन दिवसीय शो दरम्यान दोन्ही विमानतळ सर्व व्यावसायिक उड्डाणेसाठी बंद राहतील. या कार्यक्रमाची सर्व फ्लाइट ऑपरेटरना आगाऊ सूचना देण्यात आली होती आणि त्यांनी त्यानुसार वेळापत्रकात बदल केले आहेत. (हेही वाचा: PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; करणार MTHL सह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश

Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement