Nawab Malik यांच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले- 'राज्य सरकारकडून चौकशीचा प्रश्नच नाही, मला कोणतेही पुरावे दिले गेले नाहीत'

राज्य सरकारकडून चौकशीचा प्रश्न नाही कारण, समीर वानखेडे हे एका केंद्रीय एजन्सीद्वारे काम करत आहेत. मला नवाब मलिक यांच्या वक्तव्याबाबत कोणतीही माहिती नाही

Dilip Walse Patil (Photo Credits-ANI)

सध्या एनसीबीचे समीर वानखेडे हे बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात चौकशी करत आहेत. मात्र गेले काही दिवस महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक सतत एनसीबीच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. आजही मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, 'राज्य सरकारकडून चौकशीचा प्रश्न नाही कारण, समीर वानखेडे हे एका केंद्रीय एजन्सीद्वारे काम करत आहेत. मला नवाब मलिक यांच्या वक्तव्याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यांनी मला याबाबत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. मी त्याच्याकडून याबाबत माहिती घेईन, मात्र सध्या माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement