Solapur: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, कबरस्तानाकडे जाताना नदीच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास
या पूरामुळे पितापूर-अकतनाळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. हे गाव नदीच्या एका बाजूला आहे. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या हरणा नदीला मोठा पूर आला आहे. या पूरामुळे पितापूर-अकतनाळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. हे गाव नदीच्या एका बाजूला आहे. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते आहे. धक्कादायक असे की, गावाच्या बाजूला असलेल्या कब्रस्थानात जातानाही लोकांना नदीच्या पान्यातूनच वाट काढावी लागते आहे. या गावातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात प्रेताला कबरस्थानाकडे घेऊन जाताना लोकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)