Heavy Rainfall: पंचगंगा नदीचे पाणी कोल्हापूर येथे इशारा पातळीवर; संभाव्य पूरस्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन
पंचगंगा नदीचे पाणी कोल्हापूर येथे इशारा पातळीवर आले
पंचगंगा नदीचे पाणी कोल्हापूर येथे इशारा पातळीवर आले आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरस्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच कोकण विभागातही मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात प्रशासनाने खबरदारीच्या सर्व उपाययोजनांसह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)