Pune Rain: पुण्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात; नागरिकांची तारांबळ

अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्यांने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Pune Rain

पुणे शहरातील (Pune City) औंध, बाणेर रोड, सांगवी आणि विद्यापीठ परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पुणेकरांची (Rain in Pune) पुरती तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याची माहिती आहे.दुपारनंतर आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुण्यातील बाणेर, पाषाण या भागामध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now