Water Logging in Mumbai: मुंबईत मुसळधार पाऊस; अंधेरी आणि खार भुयारी मार्गाजवळ पाणी साचल्याने सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद
डी. एन. नगर येथील अंधेरी भुयारी मार्गाजवळ 2 फूट पाणी साचल्याने सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दक्षिणेकडील वाहतूक गोखले पुलामार्गे, तर उत्तरेकडील वाहतूक ठाकरे पुलामार्गे वळविण्यात आली आहे.
Water Logging in Mumbai: मुंबईमध्ये पावसाने जोर धरला असून अनेक उपनगरीय भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) X वर पोस्ट करत नागरिकांना पाणी साचलेल्या भागाची माहिती दिली आहे. डी. एन. नगर येथील अंधेरी भुयारी मार्गाजवळ 2 फूट पाणी साचल्याने सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दक्षिणेकडील वाहतूक गोखले पुलामार्गे, तर उत्तरेकडील वाहतूक ठाकरे पुलामार्गे वळविण्यात आली आहे. याशिवाय, खार भुयारी मार्गाजवळ 1 ते 1.5 फूट पाणी साचल्यामुळे खार भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सदर वाहतूक लिंकिंग रोडने वळविण्यात आली आहे. (Mumbai Rain Alert: मुंबईत मुसळधार पावसाच्या हजेरीने जनजीवन विस्खळीत; आजही जोरदार बरसण्याचा अंदाज)
मुंबई वाहतूक पोलिसांचे ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)