Heatwave Warning In Vidarbh: विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज

ओडिशा, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 9 ते 12 दिवसांपासून पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, गंगा पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि विदर्भात गेल्या 6 ते 8 दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

गेल्या अनेक दिवसांपासून देशात उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. आता याबाबत नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, पूर्व भारत आणि लगतच्या भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती उद्यापासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले की, ओडिशा, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 9 ते 12 दिवसांपासून पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, गंगा पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि विदर्भात गेल्या 6 ते 8 दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. मात्र पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement