H3N2 मुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा; आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले अहवालाची प्रतिक्षा आहे
यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावंत यांनी म्हटले आहे की, त्या मृत्यूंची कारणे अनेक आहेत. त्यामुळ अहवालाची प्रतिक्षा आहे
H3N2 मुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावंत यांनी म्हटले आहे की, त्या मृत्यूंची कारणे अनेक आहेत. त्यामुळ अहवालाची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत H3N2 विषाणूचे 352 रुग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. H3N2 प्राणघातक नाही, वैद्यकीय उपचाराने बरा होऊ शकतो. घाबरण्याची गरज नाही.