Gyanavapi Row: 'महागाई, बेरोजगारी आणि जातीय तणाव यांसारख्या समस्यांना बगल देण्यासाठी हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत'; ज्ञानवापी वादावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवार यांनी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि ब्राम्हण संघटनांमध्ये आज एक बैठक पार पडली. साधारण 40 प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवार यांनी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी ज्ञानवापी वादावरही आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले की, महागाई, बेरोजगारी आणि जातीय तणाव यांसारख्या मूलभूत समस्यांना बगल देण्यासाठी हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. मूळ मुद्दा वळवण्याचा हा डाव आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)