Grameen Kaushalya Vikas Kendras: ग्रामीण युवकांना उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी; PM Narendra Modi यांच्या हस्ते महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

अनेक देशांच्या लोकसंख्येतील वाढत्या वयोमानाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी एका अभ्यासाचा उल्लेख केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 16 देशांनी सुमारे 40 लाख कुशल तरुणांना रोजगार देण्याची योजना आखली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ केला. महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये स्थापन झालेली ही केंद्रे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवतील. जागतिक स्तरावर कुशल भारतीय तरुणांची मागणी वाढत असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. अनेक देशांच्या लोकसंख्येतील वाढत्या वयोमानाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी एका अभ्यासाचा उल्लेख केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 16 देशांनी सुमारे 40 लाख कुशल तरुणांना रोजगार देण्याची योजना आखली आहे. भारत केवळ स्वतःसाठीच नाही तर जगासाठी कुशल व्यावसायिक तयार करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कौशल्य केंद्रे स्थानिक तरुणांना जागतिक नोकऱ्यांसाठी तयार करतील आणि त्यांना बांधकाम, आधुनिक शेती, मीडिया आणि मनोरंजन आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये कौशल्य देतील. मुलभूत परदेशी भाषा कौशल्ये यासारख्या सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. (हेही वाचा: Mumbai Suicide: मराठा आरक्षणासाठी मुंबईत जालन्याच्या तरूणाची आत्महत्या- विनोद पाटील यांचा दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)