Govandi Fire: गोवडी येथे लागलेल्या आगीत 10 ते 15 घरांचे मोठे नुकसान (Watch Video)

मुंबई येथील गोवांडी परिसरात असलेल्या बैंगनवाडी येथे शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा ते पंधरा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. दरम्यान, वेळीच बचाव आणि मदतकार्य सुरु झाल्याने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Govandi Fire

मुंबई येथील गोवांडी परिसरात असलेल्या बैंगनवाडी येथे शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा ते पंधरा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. दरम्यान, वेळीच बचाव आणि मदतकार्य सुरु झाल्याने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. स्थानिक रहिवासीही या प्रयत्नात सामील झाले. ज्यामुळे आग वेळीच नियंत्रणात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, अशीच आगीची आणखी एक घटना शुक्रवारी घडली. बोरिवली येथे एका खुल्या पार्किंगला लागलेल्या आगीत 20 हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले. (हेही वाचा, Vasai Bus Fire: वसई विरार महापालिकेच्या बसला अचानक आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement