Flight Services From Nanded: खुशखबर! नांदेड येथून दिल्ली, मुंबई, अमृतसरसह इतर प्रमुख शहरांसाठी विमानसेवेला मंजुरी; तीन कंपन्या देणार सेवा
महाराष्ट्र शासन या विमानसेवेसाठी आग्रही होते. या ठिकाणी एकूण तीन कंपन्या विमानसेवा देणार आहेत.
नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यातील विविध ठिकाणच्या विमानसेवेबाबत माहिती दिली होती. राज्यातील सर्व विमानतळांच्या व्यापक विकासासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता माहिती मिळत आहे की, नांदेड येथून दिल्ली, मुंबई, अमृतसरसह इतर प्रमुख शहरांसाठी विमासेवेला मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र शासन या विमानसेवेसाठी आग्रही होते. या ठिकाणी एकूण तीन कंपन्या विमानसेवा देणार आहेत.
नांदेड विमानतळावरुन नांदेड ते मुंबई, पुणे, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे करण्यात आली होती. आता त्याला मंजुरी मिळाली आहे. (हेही वाचा: अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी सरकार सरसावले; युद्धपातळीवर काम सुरु, जाणून घ्या मिळणारी मदत)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)