Gautami Patil On Indurikar Maharaj: मीही इंदुरीकर महाराजांची फॅन; किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केलेल्या मानधनावरील टीकेला गौतमी पाटीलचं उत्तर
गौतमीने इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळलं असून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Gautami Patil On Indurikar Maharaj: कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मानधनावरून जाहीर कीर्तनातून टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, गौतमीने इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळलं असून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. झी 24 तासला प्रतिक्रिया देताना गौतमीने म्हटलं आहे की, इतर लोकांप्रमाणे मी पण महाराजांची फॅन आहे. माझ्या कार्यक्रमाच्या आयोजकांना माझं मानधन किती आहे हे माहिती आहे. 3-4 गाण्यांसाठी 3 लाख रुपये हे जरा जास्तच आहेत. माझ्यावर प्रेक्षकांचं भरपूर प्रेम आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक कार्यक्रमाला येतात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement