Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळून 10 जण जखमी
तिला पाहण्यासाठी साऱ्या गावानेच मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही तरुण दुकानाच्या पत्र्यावर चढले होते. पण याच वेळी जास्त वजन झाल्यामुळे हे पत्र्याचे छत कोसळले.
महाराष्ट्रात नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला तर मोठी गर्दी ही नेहमी होतीच. अशाच एका कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात पत्र्याचे छत कोसळून 10 जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. एका कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी गौतमी पाटील आली होती. तिला पाहण्यासाठी साऱ्या गावानेच मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही तरुण दुकानाच्या पत्र्यावर चढले होते. पण याच वेळी जास्त वजन झाल्यामुळे हे पत्र्याचे छत कोसळले.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)