Ganpatipule: गणपतीपुळे येथे व्हेल माशाचे पिल्लू अजूनही समुद्र किनाऱ्यावरच; वाचवण्यासाठी ग्रामस्थ, वन विभागाचे प्रयत्न सुरु (Watch Video)
सध्या या माशाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. मत्स्य विभागाच्या बोटीच्या सहाय्याने व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे.
गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाचे छोटे पिल्लू वाहत आले असल्याची माहिती काल मिळाली होती. या माशाला वाचवण्यासाठी व त्याला परत समुद्रात सोडण्यासाठी ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरु होते. मात्र अजूनही हे पिल्लू किनाऱ्यावरच असल्याचे समजत आहे. साधारण 36 तास उलटून गेले आहेत व हे पिल्लू किनाऱ्यावर अजूनही जिवंत आहे. या माशाचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. मत्स्य विभागाच्या बोटीच्या सहाय्याने व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे. सध्या हे पिल्लू किनाऱ्यावरील वाळूमध्ये अडकले आहे व अजूनही त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समुद्रात जाईपर्यंत हे पिल्लू जिवंत राहावे म्हणून ग्रामस्थ, अधिकारी, पर्यटक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. कचरा आणि खाद्यपदार्थ समुद्रात किंवा किनाऱ्यावर टाकल्यावर छोटे मासे येथे व हा व्हेल हे छोटे मासे खाण्यासाठीच आला असावा आणि समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल माशाचे पिल्लू वाळूत अडकून पडले असावे. (हेही वाचा: Mumbai Air Pollution: दिवाळीच्या एका दिवसानंतर मुंबईमधील प्रदूषणात प्रचंड वाढ; AQI 234 पर्यंत वाढला, 'खराब' हवेत श्वास घेणेही कठीण)
रत्नागिरी: गणपतीपुळेत व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर; ग्रामस्थ, वन विभाग कर्मचाऱ्यांकडून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू.#ratnagiri pic.twitter.com/glpr7EYzC1
— Lokmat (@lokmat) November 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2023 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

