Ganeshotsav 2023: मुंबई येथे 'वंदे भारत' संकल्पनेवर गणेश देखवा (Watch Video)
गणेशमंडळे दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारीत देखावे सादर करत असतात. त्यातील काही देखाव्यांची चर्चा होते.
मुंबईचे गणपती आणि गणेशमंडळांनी उभारलेले देखावे हे खरे तर सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू. गणेशमंडळे दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारीत देखावे सादर करत असतात. त्यातील काही देखाव्यांची चर्चा होते. मुंबईतील असाच एक देखवा चर्चेत आला आहे. ज्याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या देखाव्याबद्दल माहिती देताना, दीपक मकवाना यांनी सांगितले की, 'गणपतीच्या सजावटीसाठी दरवर्षी आम्ही मेक इन इंडियावर आधारीत एक सकंल्पना घेतो. यांदा आम्ही नवीन वंदे भारत ही थीम घेतली. इथे आल्यावर देखावा पाहून तुम्हाला वाटेल की तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर आहात. या आधी आम्ही राम मंदिर, चांद्रयान 2 आणि इतर सारख्या थीमवर पँडल डिझाइन केले होते. दरवर्षी आम्हाला संपूर्ण संकल्पना सेट उभारण्यासाठी किमान दोन महिने लागतात.
ट्विट
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)