Ganesh Visarjan 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील गणपती विसर्जनाला उपस्थिती; श्रींच्या मूर्तीवर केली पुष्पवृष्टी (Video)

नेत्यांनी गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यानिमित्त श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत.

CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Attend Ganesh Visarjan in Mumbai (Photo Credits: X/ @ANI)

Ganesh Visarjan 2024: गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात ठिकठिकाणी गणपती मूर्तींचे विसर्जन सुरु आहे. मुंबई आणि पुण्यात तर उद्या पहाटेपर्यंत हे विसर्जन सुरु राहणार. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गिरगाव चौपाटीवरील गणपती विसर्जनाला हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हेही उपस्थित होते. नेत्यांनी गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यानिमित्त श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या कामाचाही आढावा घेतला. (हेही वाचा: Ganpati Visarjan Tragedy in Dhule: गणपती विसर्जनावेळी धुळ्यात मोठा अपघात; ट्रॅक्टरखाली चिरडून तीन मुलींचा मृत्यू)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement