Ganesh Chaturthi 2024: मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गणरायाची ‘आरती’ संपन्न, भाविकांची गर्दी (Watch Video)
देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हजारो भक्त सिद्धिविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी निमित्त शनिवारी, 7 सप्टेंबर रोजी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple) पहाटे 'आरती' (Aarti) करण्यात आली. देशभरात घरोघरी आज गणपती विराजमान होणार आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरी केला जातो. हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरात गर्दी करत आहेत. पुढचे 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती विराजमान असतील. गणेशोत्सव (Ganeshotsav)हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशी दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि मंडपात गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार, या वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 वाजता सुरू झाला. दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:37 वाजता गणेश चतुर्थी समाप्त होणार आहे.
सिद्धिविनायक मंदिरात आरती