Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बंधूच्या सहभागाची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापन; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्य विधानसभेत आशिष शेलार (भाजप) यांनी उपस्थित केलेल्या 'कॉलिंग अटेंशन मोशन'ला उत्तर देताना शेलार यांनी आरोप केला की, 7 नोव्हेंबर रोजी छोट्या बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅप विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता.

Devendra Fadnavis | Twitter/ANI

Mahadev Betting App Case: महादेव अॅप प्रकरणात (Mahadev Betting App Case) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Underworld Don Dawood Ibrahim) भाऊ मुस्तकीमच्या सहभागाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली आहे. महादेव अॅप सट्टेबाजीसाठी ओळखले जाते. या अॅपद्वारे जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्य विधानसभेत आशिष शेलार (भाजप) यांनी उपस्थित केलेल्या 'कॉलिंग अटेंशन मोशन'ला उत्तर देताना शेलार यांनी आरोप केला की, 7 नोव्हेंबर रोजी छोट्या बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅप विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. (वाचा - Old Pension Scheme: 'कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल'- CM Eknath Shinde)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)